महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
कळंब येथील श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडीयम स्कूलचा बुधवार , दिनांक २९ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला . नेहमीप्रमाणे स्कुलने यावर्षीही निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे .
यामधील आलेले गुणानुक्रम :प्रथम क्रमांक :- पवार प्रतिक ज्ञानेश्वर ९५.८६%
द्वितिय क्रमांक :- सावंत ईश्वरी उदय ९३.६०%
तृतीय क्रमांक :- वाघमोडे अंकिता अनिल ९३%
रणसिंग श्रुती रोहिदास ९३%
एवढे गुण प्राप्त केले आहेत , बाकीचे सर्व विद्यार्थ्यांनी अ श्रेणी मध्ये उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश संपादन केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे , सचिव दत्तात्रय फडतरे , प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .