
पुसेसावळी ता.खटाव येथे फार्मासिस्ट बांधवांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना जिल्हाध्यक्ष सागर पाटील,सचिव राहुल मोहिते,सहसचिव धनंजय माने,तालुकाध्यक्ष अरविंद जाधव,सचिव अतुल इनामदार उपस्थित होते.
विजय पाटील पुढे म्हणाले आतापर्यंत औषध व्यवसाय परिषदेच्या माध्यमातुन फक्त औषधनिर्माता नावनोंदणी व परवाना नुतनीकरण करण्यात येत होते,परंतु जगन्नाथराव आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश पाटील,अमिन नागा व सर्व सहकार्यांच्या मदतीने परिषदेचे कार्यालय नुतन इमारतीत स्थलांतर करुन भारतातील पहिले औषध माहिती केंद्र अर्थात ड्रग इन्फाॅरमेशन सेंटर चालु केले,याचबरोबर पेशंट काॅन्सेलिंग कोर्स,अॅडवान्स पेशंट काॅन्सेलिंग कोर्स,दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी जागतिक औषधनिर्माता दिन साजरा करण्यास सुरवात केली.तसेच हाॅस्पीटल,शैक्षणिक,सरकारी,औद्योगिक,रेग्युलेटरी यासर्व क्षेत्रातील फार्मासिस्टच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम चालु केले असुन पदविका व पदवी विद्यार्थ्याना शिक्षण अधिनियम 1991 नुसार अभ्यासक्रम होता, सध्याच्या काळानुसार ज्ञान अद्यावयत होण्यासाठी सध्याच्या परिषदेतील सदस्यांनी सर्वांच्या सहकार्याने झोकून देवुन काम केले असुन नोंदणीकृत औषधनिर्मात्यांसाठी दर महिन्याला नवीन विषयावर ई न्यूज लेटर,औषध माहिती/संवाद पुस्तिका,गर्भावस्थेतील व मातृत्वातील हानिकारक औषधे,बालकांसाठी अत्यावश्यक औषधे,किडणी व लिव्हर साठी हानीकारक औषधे सुची,रुग्ण समुपदेशन गाईड अशी विविध पुस्तके निर्माण केली असुन पीपीएफ कार्ड मध्ये बदल करुन अद्यावयत क्युआरकोड सहित स्मार्ट कार्ड आणले असुन यामध्ये फार्मासिस्ट ची सर्व माहिती असणार असुन भविष्यात ही महाराष्ट्र औषध व्यवसाय परिषदेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असुन यावेळी महाराष्ट्र औषध व्यवसाय परिषद निवडणुकीसाठी सेंट्रल विभागातून अतुल अशोकराव अहिरे,अमरावती विभागातून गणेश चंद्रकांत बंगळे,मुंबई विभागातून नितीन नवनीतराय मणियार,मराठवाडा विभागातून मनोहर सोपान कोरे,नागपुर विभागातून सोनाली देवीदास पडोळे,व पश्चिम महाराष्ट्र विभागातून विजय पांडुरंग पाटील हे सर्व एमएससीडीए चे अधिकृत उमेदवार असुन विजय पांडुरंग पाटील हे गेली नऊ वर्ष महाराष्ट्र औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत परंतु यावेळी नावात साधर्म्य असणारे अनेक जण उभे आहेत तरी सर्वांच्या संपुर्ण नावाची खात्री करुन आशिर्वादरुपी मत देवुन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले,यावेळी विजय कदम,अजय परदेशी,शिवलिंग देशमाने,आनंदा कदम,सुरेश भोसले उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अविनाश काशीद यांनी केले.




















