महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
फलटण येथील प्रांत अधिकारी शिवाजी नवनाथ जगताप तसेच फलटण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमिता गावडे त्यांच्यावर येत्या 15 ऑगस्टपूर्वी निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. अन्यथा सातारा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष व जिल्ह्यातील पदार्थ पदाधिकारी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अनुसार फलटण येथील उपविभागीय अधिकारी नागरिकांना अपमानास्पद वागणूक देतात. तसेच येथील सर्व शासकीय कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने नागरिकांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. सोमंथळी ता. फलटण येथील गेली 40 वर्षे वहिवाटीत असणाऱ्या रस्त्यास अचानक स्थगिती दिल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. हा रस्ता सोमंथळी ग्रामस्थांची जीवन वाहिनी असल्याचे सांगत यापूर्वी तीन वेळा या रस्त्याच्या संदर्भात तहसीलदारांनी निकाल दिलेले आहेत. परंतु दोन वेळा प्रांत अधिकारी यांनी कॅव्हेट दाखल असून सुद्धा स्थगिती दिली आहे. राजकीय दबावामुळे रस्त्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जात नाही .त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून पूर्वी झालेल्या शासकीय निर्णया नुसार बंद केलेला सार्वजनिक रस्ता पुन्हा खुला करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी फलटणचे उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. या निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हापालक मंत्री, तसेच सातारा जिल्हाधिकारी, सातारा पोलीस प्रमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्यासह महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र घाडगे ,नितीन यादव, सुभाष जाधव, दादा जाधव, सचिन खानविलकर, प्रमोद गाडे , शिवाजी सोडमिसे, बाळासो शिपकुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत























