महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
पुणे ;निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चौकशी करावी, असे आदेश पुणे न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी पोलिसांना दिले आहेत. यावर 15 सप्टेंबरपर्यंत माहिती सादर करावी, असंही न्यायालयाने म्हटलं.
माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत अर्ज करताना चुकीची माहिती दिल्याचा आरोप अभिषेक हरिदास यांनी केला होता. तसंच याबाबत तक्रार करत त्यांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पण सदर तक्रार आपल्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया ट्वीट करीत चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे






















