महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याच्या लोकनेत्या व राष्ट्रवादी पक्षाच्या लोकप्रिय खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांच्या विशेष सहकार्यातून आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन मंत्री तथा पालकमंत्री नामदार मा.बाळासाहेब पाटील यांच्या आशीर्वादाने ओगलेवाडी हजारमाची गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील “वृषाली गिरीश मंडले” वय वर्षे तीन या मुलीला दोन्ही कानाने ऐकू येत नसल्याने मोफत श्रवण यंत्र देण्यात आले व पुढील उपचाराची सर्व जबाबदारी घेण्यात आली त्याबद्दल मंडले कुटुंबानी मंत्री महोदयांचे आभार मानले.
मी समाजसेवक या नात्याने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय पी डी पाटील साहेब आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराण वर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर ऋणी राहील. राजूभाऊ सूर्यवंशी ( सातारा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल).