महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी :
आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आता ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. ‘मिशन बिगीन अगेन’चा दुसरा टप्पा आता ३१ जुलैपर्यंत असणार आहे. यावेळी पहिल्या टप्प्यातील नियम कायम असणार आहे.
यावेळी दोन जिल्ह्यामधील प्रवासाला बंदी कायम असणार आहे. तर सर्व सामान्यांना एसटी बसमधून प्रवास करता येणार नाही. दरम्यान, अनलॉक १.० सुरु झाला होता. मात्र, आता अनलॉक २.०हा ३१ जुलैपर्यंत असणार आहे. मात्र, यावेळी काही ठिकाणी कठोर लॉकडाऊन कठोरपणे राबविले जाण्याची शक्यता आहे.