बारामती प्रतिनिधी
बारामतीत सकाळी एकूण ८० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते , त्यापैकी ५९ नमुने निगेटिव्ह आले असून २१ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे, तसेच काल संध्याकाळी ५६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्यांचाही प्रतीक्षेत आहे काल रात्री बारामती शहरातील भिगवन रोड येथील एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे . यामुळे मृतांची संख्या १९ झाली असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.