श्री चक्रपाणी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या फलटणमध्ये महा स्थानाची दरवर्षी चैत्र वद्य पंचमीला यात्रा भरते. या वर्षी दिनांक 21 एप्रिल रोजी घोड्याची यात्रा असून त्यानिमित्ताने…..
फलटण नागरी महानुभावांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या पद स्पर्शांनी ही नगरी पावन झाली आहे. याठिकाणी श्रीकृष्ण आबासाहेब मंदिर, श्री चक्रपाणी जन्मस्थान मंदिर, श्री बाबासाहेब मंदिर, श्री दत्त मंदिर, श्रीरंग शिळा मंदिर आहेत. या सर्व मंदिरामध्ये सर्वाधिक भाविक प्रिय मंदिर म्हणजे श्रीकृष्ण बाबासाहेब मंदिर, या मंदिरामध्ये आरतीच्या वेळी भाविकांची अलोट गर्दी असते.
श्रीकृष्ण भगवंताचे मानव रूप दारी श्री चक्रपाणी राऊळ या परमेश्वर अवताराने आणि आपल्या अलौकिक लीलांनी या भूमीला पावन केले. येथील घरोघरी मठ मंदिर, तळे तळी लिया, बावी पोखरणी येथे श्री चक्रपाणी राऊळ यांच्या बाल क्रीडा होत होत्या. श्री चक्रपाणी राऊळ यांचे श्री चक्रपाणी महाराजांच्या चरणी पवित्र व्यक्तिमत्व मजबूत लीलांनी जन्म माणसांना संमोहित करीत होते. श्रीरंग बसवेश्वर वयाच्या चौथ्या वर्षी चारी वेदाचे निरूपण करून अवघ्या नगरीचे गुरुत्व स्वीकारले.
प्रमुख पाच दैवत.
महानुभव पंथात पाच दैवतांना मान्यता असून त्यांची पूजाअर्चा केली जाते. त्यामध्ये श्रीकृष्ण, श्री दत्तात्रेय प्रभु, श्री चांगदेव राऊळ, श्री गोविंद प्रभु आणि श्री चक्रधर ही पाच दैवत असून त्यास पंचकृष्ण असे म्हणतात.
पुण्यवान फलटण नगरी महानुभावांचे सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान असून यामहा क्षेत्र फलटण नगरीमध्ये चैत्र वद्य पोर्णिमा ते चैत्र वद्य पंचमी असा वार्षिक यात्रा महोत्सव केव्हा सुरू झाला हे कोणालाच माहिती नाही. पूर्वीपासून हिंदू धर्मातील रीतीरिवाजाप्रमाणे मान, खटाव ,सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील परिसरातील भाविक जेजुरीच्या खंडोबाला पितळेचे घोडे वाहण्यासाठी जात असत. जाताना फलटण येथील बानगंगा नदी किनारी श्रीकृष्ण मंदिरामागे ते मुक्काम करत. अशाच एका वेळी मुक्काम करून भाविक निघताना पितळेचे घोडे घेऊन निघाले . त्यातील एक घोडा उचलता उचलत नव्हता, म्हणून प्रत्येक देवाचे नामस्मरण करून पितळी घोडा उचलून पाहिला, तरी तो उचलला नाही. शेवटी श्रीकृष्णाचे नामस्मरण घेताच पितळेचा घोडा उचलला गेला. त्यामुळे तो घोडा श्रीकृष्ण बाबासाहेब मंदिरामध्ये वाहण्यात आला आणि तेव्हापासून घोड्याची यात्रा सुरू झाली. अशी अख्यायिका महानुभव पंथात सांगितली जाते.
महानुभाव व इतर सर्व जाती धर्मातील भाविक भारतातून या यात्रे निमित्त फलटणला येत असतात. या यात्रेला पौर्णिमेपासून छबिना मिळविला जातो. यावेळी मंगला अभिषेक, त्रीकाळा आरती, गीता पाठ, नामस्मरण असा धार्मिक सोहळा संपन्न होतो. चैत्र वद्य पंचमीला श्रीकृष्ण मूर्तीची पालखीतून सवाद्य शोभायात्रा काढण्यात येते. पालखीच्या पुढे पितळी घोडे मानकरी डोक्यावर घेऊन मिरवत असतात. भूत पिशाच्च, करणी इत्यादी व्याधी पीडित स्त्री-पुरुष पालखीपुढे नाचत, उड्या मारत, आरडत ओरडत परमेश्वर चरणी विनंती करतात. त्याला या दुःखातून मुक्तता मिळते. आनंदाने समाधानाने तो भक्त श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन घेऊन भक्तीरसात तल्लीन होतो. फलटण येथील या घोड्याच्या यात्रेत इतर धर्मीय लोक सुद्धा मोठ्या संख्येने व श्रद्धेने सहभागी होतात. गुण आला तर ते नवस फेडण्यासाठी फलटणला येतात. भूत बाधा, वेड, प्रापंचिक अडचणी यापिडे पासून मुक्तता मिळावी, श्रद्धेने आजही सामान्य जन या यात्रेसाठी फलटणला येतात.
































