महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव :
खटाव तालुक्यातील वडूज येथील डॉ बी जे काटकर हॉस्पिटल शासनाने कोविड 19 चे अनुषंगाने अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र खटाव व माण तालुक्यातील हृदयविकार, सर्पदंश व इतर तत्सम आजारावर उपचार होत असलेले मुख्य हॉस्पिटल आहे. दोन तालुक्यातील बऱ्याच रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागतो याखेरीज रुग्णांना कराड व सातारा येथे जावे लागते. मायणी येथे कोविड 19 चे रुग्णांवर उपचार घेण्यासाठी 350 बेडची सोय करण्यात आली आहे. हृदयविकाराचे जवळपास 100 रुग्ण तर इतर 2000 रुग्ण एका महिन्यात तपासले जातात. या हॉस्पिटलच्या आजूबाजूला लोकवस्ती असल्याने शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नगरपंचायत वडूज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ना. तहसीलदार श्री. शिर्के यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष सुनील गोडसे,जितेंद्रदादा पवार, मजूर संचालक सचिन माळी, पृथ्वीराज गोडसे,डॉ. संतोष गोडसे,नगरसेवक विपूल गोडसे,धनंजय क्षीरसागर, बाळासाहेब पोळ, राजेंद्र चव्हाण, प्रदीप खुडे, संदिप गोडसे, राजेंद्र कुंभार,अमोल वाघमारे,बाबासाहेब फडतरे उपस्थित होते.