कोरोना पार्श्वभुमीवर साध्या पध्दतीने पण उत्साहपुर्ण वातावरणात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संघटक व श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम संस्थेच्या सभागृहात विराजमान गणरायाची आरती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या शुभहस्ते आणि मा. संजय भोकरे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या परिसरांत यानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. मिरजेतील बालगृह पाठक अनाथाश्रमात शिधावाटप करण्यात आले. याप्रसंगी, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सिध्दार्थ भोकरे, ॲडमिनीस्ट्रेटर डायरेक्टर पराग इनामदार यांचेसह दिगंबर शिंदे, नामदेव भोसले, डाॅ. ए.सी. भगली, डाॅ. संदीप शेळके, सी.पी.दिवटे, सौ. जे. एस. पाटील, सौ. धनश्री चक्रबोर्ती व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.