महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी :सुनील निंबाळकर
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने गेल्या सहा वर्षात केलेल्या कामकाजाबद्दल ची माहिती एका पुस्तकाद्वारे लिहिली असून या विशेषांकाचे नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील एका कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
बारामती येथे पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याची सद्यस्थिती जाणून घेत गेल्या सहा वर्षात केलेल्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाचे कौतुक करीत सोमेश्वर सर्वच बाबतीत यापुढे अग्रेसर राहावा यासाठी सर्वांनी काम करावे, अशी सूचना देखील त्यांनी केली,यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे व्हाईस चेअरमन शैलेश रासकर, संचालक सचिन खलाटे, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यावेळी उपस्थित होते.