पाटण : मोरगिरी विभागातील कोकिसरे, ता. पाटण येथे सागवाण झाडांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तोड झाल्याचे आढळून आले आहे. कोकिसरेतील एका घराजवळ रस्त्याच्याकडेला तोडलेला सागवाण लाकडाचा साठा करून कोणाच्या निदर्शनास येवू नये यासाठी त्यावर गवत टाकण्यात आले होते. याची माहिती मिळताच पाटणचे वनक्षेत्रपाल पोतदार यांच्यासह टीमने घटनास्थळी जावून तो साठा जप्त केला आहे. याचा पंचनामा करण्याचे काम वनविभागाकडून सुरू असून हा साठा कोणाचा आहे व तोडलेले सागवण हे खाजगी की वनविभागाच्या क्षेत्रातील आहे याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
गेल्या चार दिवसांपासून कोकिसरे येथे सागवण लाकडाची मोठ्या प्रमाणात तोड करून एका घरानजीक त्याचा साठा करण्यात आला आहे. ही बाब कोणाच्या निदर्शनास येवू नये यासाठी या साठ्यावर गवत टाकून झाकण्यात आले आहे. याबाबतची माहिती वनविभागाला समजल्यानंतर पाटणचे वनक्षेत्रपाल पोतदार व वनाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून सागवणाच्या साठ्याचा पंचनामा सुरू केला आहे. तसेच तोड झालेल्या सागवणाची लाकडे जप्त करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती पाटण वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आली आहेत. दरम्यान ही तोडलेली सागवणाची लाकडे खाजगी क्षेत्रातील की वनविभागाच्या क्षेत्रातील आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही.
कोकिसरे येथे ज्याठिकाणी तोड झालेली आहे तेथे भूस्खलन झाल्याने हद्दी इकडे तिकडे झाल्या असून त्या लक्षात येत नाहीत. त्यासाठी जागेचा सर्वे करण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर वृक्ष तोडही खाजगी की वनविभागाच्या हद्दीत झाल्याचे निष्पन्न होईल. त्यानंतर अनलिगल असेल तर कारवाई करण्यात येईल. सध्या तरी तोडीबाबात कोणताच परवाना घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सागवण लाकडाचासाठा जप्त करण्यात आला आहे.
पोतदार, वनक्षेत्रपाल पाटण तालुका