फलटण प्रतिनिधी
फलटण शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.दि. 27 ऑगस्ट रोजी फलटण शहर आणि तालुक्यात एकूण 72 कोऱोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात 33 तर ग्रामीण भागात 39 रुग्णांचा समावेश आहे . दि.26 ऑगस्ट रोजी फलटण शहरात एकूण 12 आणि फलटण तालुक्यात 9 रुग्ण कोरूना बाधित रुग्ण सापडले.दि. 25 ऑगस्ट रोजी एकूण 49 कोरोना बाधित रुग्ण सापडले. त्यापैकी फलटण शहरातील 20 आणि ग्रामीण भागातील 29 रुग्णांचा समावेश आहे. फलटण शहरातील संजीव राजे नगर, मंगळवार पेठ, भडकमकर नगर, लक्ष्मीनगर, कसबा पेठ ,रविवार पेठ, मेटकरी गल्ली आदी ठिकाणी रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात साखरवाडी, कोराळे, कोळकी, गिरवी, आसू ,विडणी, बीबी, बिरदेव नगर जाधववाडी ,तरडगाव, सरडे, रावडी, वडजल, कांबळेश्वर, फरांदवाडी याठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.




















