महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:- तेजस काटकर,सातारा (वाढे)
सातारा शहरापासून उत्तर कोरेगाव दिशेला जाणारा वेण्णा नदीवरील वाढे गाव शेजारी असलेला पूल खड्ड्यांमुळे धोक्यात आला आहे.काही दिवसांपूर्वीच याची डागडुजी झाली होती पण आत्ताच्या खड्ड्यामुळे रस्त्याचा दर्जा ची पोलखोल उघड झाली आहे.सर्व पूल धोकादायक परिस्थितीमध्ये झाला असून पुलावर मोठे खड्डे पडले असल्याने स्त्यावरून ये-जा करणार्या सर्व वाहनांना त्याचा त्रास होत असून, दुचाकी गाड्या खड्ड्यात अडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी स्थानिक ग्रामस्थांची व प्रवाशांची मागणी होत आहे.























