ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलनाद्वारे निवेदन सादर
महाराष्ट्र न्यूज खंडाळा प्रतिनिधी : बिलकीस शेख
सातारा जिल्हा खंडाळा तालुक्यातील समस्त धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ढोल बजाओ सरकार जगाओ या शिर्षकाखाली शासनास जाग आणण्यासाठी शिवाजी चौक ते खंडाळा तहसीलदार कार्यालय या मार्गावर ढोल वाजवत भंडारा उधळत आरक्षण विषयक घोषणा देत मोर्चा काढुन खंडाळा तहसिलदार दशरथ काळे यांना निवेदन दिले.
धनगर समाजास एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ,याकामी यापुर्वी अनेक आंदोलने केली आहेत त्यावेळी अनेक बांधवांना आपला जिव गमवावा लागला आहे अशांच्या कुटुंबांना ठोस शासकीय मदत मिळावी, मेंढपाळांना संरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बरेच वर्ष संघर्ष करित आहे.धनगर बांधवांना आरक्षण देवु असे बर्याच राजकिय पक्षांनी आश्वासन दिले परंतु ते आश्र्वासन कुणीच पुर्ण केले नाही यामुळे धनगर समाज आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
या आंदोलनात माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य रमेश धायगुडे,माजी पंचायत समिती सदस्य बापूराव धायगुडे, जिजाबा काळे, लोणंद नगराध्यक्ष सचिन शेळके, नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील, ज्येष्ठ नेते अशोक धायगुडे, युवा नेते ऋषीकेश धायगुडे, अॅड. वैभवराव धायगुडे-पाटील, सुरज शेळके पाटील, हर्षवर्धन शेळके पाटील, लक्ष्मणतात्या शेंडगे, धैर्यशील नरुटे, भगवानराव ठोंबरे, आदी खंडाळा तालुक्यातील सर्व क्षेत्रातील धनगर समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. आंदोलन शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खंडाळा पोलीस स्टेशन वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता