फलटण तालुक्यातील शहरालगत असलेल्या व शहर प्रभावित असलेल्या ग्रामपंचायत फरांदवाडी येथे मागील एका वर्षात केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा २०/३/२०२२रोजी पार पडला. यामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला.यामध्ये वार्ड क्रमांक दोन मधील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण, स्मशानभूमी ची दुरुस्ती, गटार दुरुस्तीची कामे, सार्वजनिक शौचालय, व वॉर्ड क्रमांक तीनच्या अंगणवाडी साठी शौचालय. वार्ड क्रमांक दोन मधील खराब झालेल्या रस्त्याचे मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली. वार्ड क्रमांक दोन मध्ये तांबामळा येथील पाईपलाईन चे काम व वार्ड क्रमांक एक मधील सावित्रीबाई उद्यानाचे काम होण्याच्या मार्गावर आहे. तसेच प्रस्तावित कामामध्ये जल जीवन मिशन योजनेचे काम मंजूर असून पुढील दोन महिन्यांमध्ये सुरू होत आहे .

या गावांमधील तरुण वर्गाला प्रेरणा देण्यासाठी चौधा लाखाची व्यायामशाळा मंजूर करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. यामध्ये या ग्रामपंचायत च्या वर्षपूर्ती काळात ३० घरकुल योजना मंजूर करण्यात आल्या . कारोना सारख्या बिकट परिस्थिती वरून मात करून या ग्रामपंचायतीने विकास कामांचा धडाका सुरू ठेवलेला आहे.






















