महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
बारामतीचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगांवकर यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पदक जाहिर झाले आहे. त्यांना हे पदक गंगाखेड येथील कामगिरी बद्दल जाहिर झाले आहे .
सन २०१६ च्या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नारायण शिरगांवकर गंगाखेड येथे कार्यरत होते. त्यावेळी परभणी जिल्ह्यातील सोनपेट येथे कार्यरत असताना पाच वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार झाला होता. त्यावेळी तेथील वातावरण ढवळून निघाले होते. मात्र शिरगांवकर यांनी कुठलाही अनुचित प्रकार होवू न देता , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही या घटनेचा तपास काटेकोरपणे करून, पुरावे गोळा करून आरोपीला अटक केली होती. नंतर आरोपीला फाशी झाली होती .
नुकतेच केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्यातील उत्कृष्ट तपासणी अधिकारी मधून दहा जणांची निवड करण्यात आली. यामध्ये शिरगांवकर यांचीही निवड केली आहे. शिरगांवकर यांनी कोरोनाच्या काळातही बारामती व परिसरात वेगवेगळे पॅटर्न वापरून लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती