महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सातारा तालुक्यातील तासगाव येथे कृतज्ञता युवामंच व संस्कृती शैक्षणिक सामाजिक विकास संस्था च्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी इत्यादींचे सर्व कर्मचारी व अधिकारी

यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. कृतज्ञता युवा मंच चे ध्वजारोहण वीर जवान विजय माने यांच्या हस्ते करण्यात आले. व मंचातील सदस्यांच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून कार्यक्रम संपन्न झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सुरक्षितता व नियमांचे पालन करीत ध्वजारोहन करण्यात आले होते.
































