संस्थेचा पर्यावरणपूरक उपक्रम — विद्यार्थ्यांना केले औषधी वनस्पतीचे वाटप.
मलकापूर – श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्यू.कॉलेज मलकापूर येथे 9 ते 12 वी चा विदयार्थी समवेत कोरोना नियमांची अंमलबजावणी करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रामचंद्र जाधव सर यांनी केले.
कॉलेजचे विद्यार्थी यांनी तळबीड वरून शिवज्योत पहाटे आणून शिवजयंतीची सुरवात आनंदाने उस्ताहाने केली त्याच बरोबर विदयालयामध्ये 9 वी ते 12 विदयार्थ्यांनी भाषणे ,पोवाडे त्याचबरोबर वेशभूषा करून मोजक्या विद्यार्थी समवेत शिवजयंतीचा उस्ताह हा कायम ठेवला.
शिवजयंतीच्या निमित्ताने श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेने औषधी वनस्पतीचे विद्यार्थ्यांना वाटप करून हा कार्यक्रम साजरा करून शिवरायांचा पर्यावरणपूरक विचार विद्यार्थ्यांपर्यत पोहचवला.
या शिवजयंतीचा निमित्ताने कॉलेजचे विभाग प्रमुख सौ. स्वाती जाधव मॅडम पर्यवेक्षक व सर्व स्टाफ उपस्थित होता. या कार्यक्रमानिमित्त श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव मा. अशोकराव थोरात भाऊ, संचालिका व कोआॕर्डिनेटर डॉ. स्वाती थोरात मॅडम, अध्यक्ष पी.जी. पाटील , उपाध्यक्ष बी. बी. पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के ,संचालक वसंतराव चव्हाण गुरूजी , मा.संजय थोरात यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
अशा प्रकारे स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये 9 वी ते 12 वी चा समवेत शिवजयंती समारंभ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.