महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असता आज कराडमध्ये शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांचा निषेध करण्यात आला.
तहसीलदार अमरदीप वाकडे व कराड शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करून निषेध व्यक्त करण्यात आला व नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, यावेळी शिवसेना जिल्हाअध्यक्ष जयवंतराव शेलार, रामभाऊ रैनाक उपजिल्हाध्यक्ष, सातारा जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनिता जाधव, नितीन काशीद तालुकाप्रमुख,शशिकांत हापसे तालुकाप्रमुख,शशीराज करपे शहर प्रमुख,राजेंद्र माने ग्राहक सेवा उपाध्यक्ष,सतीश कृष्णा पाटील शिवसेना तालुकाप्रमुख कराड उत्तर,मधुकर महादेव शेलार शिवसेना मलकापूर शहर प्रमुख,अतुल गोविंद वैद्य मसूर उपशहर प्रमुख कराड उत्तर,नितीन पांडुरंग देसाई,सुनील शिंदे,सुभाष पाटील,शरद कुंभार,संदीप पवार,दत्ता पवार,अविराज देशमुख, सुनील पाटील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष,उपाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.