बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे
बारामती तालुक्यातील चौधरवाडी हद्दीत मोठे वनक्षेत्र असल्याने चिंकारा, तरस, ससे, मोर असे वन्यप्राणी पाणी किंव्हा चऱ्याचा शोध घेत भटकंती करत असतात. चौधरवाडी शेजारील भापकरमळा येथील काही तरूण युवक शेतामध्ये काम करीत असता त्यांना जवळच्या शेतात भटकंती करण्यास आलेल्या एका चिंकारा जातीच्या हरणाचा काही भटकी कुत्री पाठलाग करताना पहिले ,त्याचा जीव वाचवण्यासाठी तरुणांनी त्या शेताकडे धाव घेत भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली परंतु त्या हरणास जखमी केले होते . एका तरुणाने लगेच गावचे पोलीस पाटील राजकुमार शिंदे यांना संपर्क करून , वनक्षेत्र (फॉरेस्ट) चे वरिष्ठ अधिकारी योगेश कोकाटे,कर्मचारी नंदकुमार गायकवाड , नवनाथ रासकर , घटनास्थळी धाव घेतली तसेच त्वरित वाहनांची सोय करत त्या जखमी हरणास पुढील उपचारासाठी पुणे येथे रवाना करण्यात आले. या घटनावेळेस भापकरमळा येथील युवराज भानुदास भापकर ,विशाल ज्ञानेश्वर भापकर ,अक्षय भापकर ,अनिल भापकर ,शुभम भापकर ,राहुल भापकर या तरुणांनी तसेच सोसायटीचे चेअरमन रोहिदास चौधरी ,विलास भापकर ,भाऊसो भापकर.संभाजी भापकर यांनी मोलाचे सहकार्य केले .