उंब्रज प्रतिनिधी :
आज मंगळवार दि.२१/०२/२०२३ पासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इ.१२ वी ची बोर्डाची परीक्षा सुरू होत असून , आज पहिल्या पेपर च्या अनुषंगाने प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थी तसेच पालक यांची गर्दी दिसून आली , वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचं मोजमाप करण्यासाठीचं आजचं पहिलं पाऊल , बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांचे पालक आज आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर सोडायला आले होते , ते मुलांना पेपर विषयी काय काळजी घ्यायची , पेपर कसा लिहायचा , परीक्षेचं दडपण कसं झुगारून लावायचं या गोष्टी समजावून सांगत होते , शेवटी या परीक्षेच्या गुणांवर आधारीतच मुलांचं पुढचं भविष्य अवलंबून आहे हे विद्यार्थी आणि पालक दोघेही जाणून आहेत , काही मुलांच्या चेहर्यावर तसे भावही जाणवत होते . परगावची मुलं आणि पालक उशीर व्हायला नको म्हणून वेळेअगोदरच परीक्षा केंद्रावर हजर राहिली होती.
उंब्रजच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाअंतर्गत ही बोर्डाची परीक्षा होत असून उंब्रज केंद्राआंतर्गत चाफळ , चरेगाव , मसूर आणि उंब्रज या गावातील एकूण ७३८ विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत अशी माहिती उंब्रजच्या केंद्रप्रमुखांनी दिली.तसेच परीक्षा काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उंब्रज पोलीस स्टेशन चे ए.पी.आय.अजय गोरड यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
































