महिलांचे सक्षमीकरण हाच भारताच्या सक्षमीकरणाचा आणि प्रगतीचा खरा पाया आहे असे प्रतिपादन कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती शीला झांजुरणे यांनी केले येथील पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी पंचायत समिती सदस्य साधना बनकर मंगल गंगावणे तसेच गटविकास अधिकारी श्रीमती क्रांती बोराटे सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद मोरे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजित इंगवले तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी सभापतींनी महिलांचे समाजातील स्थान आणि भारताचे भवितव्य याविषयी मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की महिलांना संधी मिळाल्यास त्या निश्चितच प्रगती करू शकतात समाजातील सर्व घटकांनी त्यांना सहकार्य करावे म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल गटविकास अधिकारी क्रांती बोराटे म्हणाल्या महिला दिन हा केवळ एक दिवस नसून संपूर्ण वर्ष महिलांचे सक्षमीकरण तसेच त्यांचा उत्कर्ष साधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा महिलांमध्ये कित्येक क्षमता असतात त्या क्षमतांना आपण वाव द्यायला पाहिजे यावेळी डॉक्टर मिलिंद शहा तसेच विविध कायदे तज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून महिलांचे प्रबोधन केले यामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणा विरुद्ध लढा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच जीवन उन्नती अभियान आतील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच कोरेगाव पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भूमिका मांडल्या त्यांनी आपले अनुभव सर्व सभागृहाला आत्मविश्वासाने सांगितले यशेंद्र क्षीरसागर यांनी संचालन केले एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजित इंगवले यांनी आभार मानले