महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले
मराठी पत्रकार परिषद , मुंबई यांच्याकडून कोरोना काळात बळी गेलेल्या पत्रकारांना शासनाकडून ५० लाखांची मदत मिळावी म्हणून आणि इतर काही मागण्यासाठी शुक्रवार, दि.१८ सप्टेबंर रोजी पुणे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक तथा हवेली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलनाना जगताप, मार्गदर्शक, जेष्ठ पत्रकार तुळशीराम घुसाळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दादाराव आढाव, बाबासाहेब तारे, हवेली तालुका पत्रकार संघ सचिव अमोल भोसले, संघटक संदिप बोडके, राजेश धिवर, ए.टी.माने आदी पत्रकार उपस्थित होते