अंदोरीच्या सनराईज स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट प्रतिमा वितरीत
महाराष्ट न्यूज प्रतिनिधी :
खंडाळा तालुक्यातील कराडवाडी (अंदोरी) येथील सनराईज इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ७४ वा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण करताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचेही स्मरण करणारे त्यांचा जीवनपट माहिती वितरित करणारी प्रतिमा देण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे समन्वयक,सुजन फौंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांच्या विरोधात खंबीरपणे लढणारे जहालवादी क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट या प्रतिमेचे प्रकाशन अजित जाधव यांनी केले.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निषेध निकष वापरून साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारंभ साजरा करण्यात आला ध्वजवंदन कार्यक्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी कारंडे यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न होत असताना शाळेचे उपाध्यक्ष योगेश शेंडगे, शाळेचे मुख्याध्यापक दादासो धायगुडे,शिक्षक साजिद शेख ,यशराज शेंडगे, रमेश शेंडगे आदी उपस्थिती होते.






















