महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: फलटण
वीर धरणातून सुमारे 42,000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वीर विद्युत गृहातून 800 क्यूसेक्स आणि धरणाचे सर्व दरवाजे 4 फुटाने उघडल्याने त्यामधून 40410 क्यूसेक्स असा एकूण 41210 क्यूसेक्स विसर्ग सध्या नीरा नदीत सुरू आहे. तर सुमारे 500 क्यूसेक्स विसर्ग नीरा उजवा कालव्यातून सुरू आहे सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
होळ व इतर कमी उंचीचे पुलावरून पाणी वाहत आहे.सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असल्याने रात्री विसर्ग वाढवण्याची दाट शक्यता आहे.सबब सर्व नागरिकांना याद्वारे दक्षता घेण्याविषयी सूचित करण्यात येत आहे. असे आवाहन फलटण तहसील कार्यालयातील तालुका नियंत्रण कक्षा तर्फे करण्यात आले आहे नागरिकांसाठी पुढील खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू नये अथवा पोहण्यासाठी जाऊ नये. पुलावरून /ओढ्यावरून पाणी वाहत असेल तर पूल ओलांडू नये.
घाटातून प्रवास टाळावा व दरड प्रवण क्षेत्रात जाऊ नये. सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे. जनावरांना नदी नाल्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावे.दरम्यान नीरा प्रणालीतील भाटघर ,वीर, नीरा देवधर आणि गुंजवणी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे काल आखेर पाणीसाठा 88.34 टक्के झाली असल्याची माहिती वीर धरण सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.