महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :श्रीकृष्ण सातव:
निवृत्तीवेतन धारकांनी आयकर गणना जुन्या पद्धतीने करावयाची आहे किंवा नव्या पद्धतीने करावयाची आहे याबद्दलची माहिती 30 सप्टेंबर 20 पूर्वी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई यांना कळवायची आहे.आशा आशयाचे परिपत्रक अधिदान व लेखा अधिकारी वैभव राजेघाटगे यांच्या सहीने काढण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष 20- 21 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन सेक्शन 115BAC नुसार आर्थिक वर्ष 20 -21 साठी च्या आयकर गणनेसाठी नवीन आणि जुनी आयकर पद्धतीने गणना असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत नवीन आयकर गणनेत आयकराचे टप्पे अडीच लाखापर्यंत आयकर नाही, अडीच लाख ते 5 लाखापर्यंत 5%, 5 ते 7.5 लाखापर्यंत दहा टक्के आयकर, 7.5 ते 10 लाखापर्यंत पंधरा टक्के: 10 लाख ते 12 लाखापर्यंत वीस टक्के: 12.5 लाख ते 15लाखापर्यंत 25% आणि 15 लाखाच्या वर तीस टक्के आयकर कपात करण्यात येणार आहे.
या नवीन आयकर गणनेत 50000 प्रमाणित वजावटीची सूट काढून घेण्यात आलेली आहे. तसेच 80 C 80 80 G गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे सर्व निवृत्तीवेतन धारकांनीआपला निवडलेला पर्याय apaopensdat-mh@gov.in या ईमेल आयडीवर आपल्या पीपीओ नंबर , बँकचे नाव, शाखा या सर्व माहिती सहित 30 सप्टेंबर 20 पूर्वी कळविण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार त्या निवृत्ती वेतन धारकांनी निवडलेल्या पर्यायानुसार टीडीएस कपात वजावट करण्यात येणार आहे. जे निवृत्तीवेतनधारक निवडलेल्या आयकर गणनेचा पर्याय माहिती वेळेत कळविणार नाहीत त्यांची पूर्वीप्रमाणेच टीडीएस कपात करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट20 रोजी हे परिपत्रक काढण्यात