महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी फलटण
गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी फलटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 झाली आहे. आज सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या 12 रुग्णांमध्ये मंगळवार पेठ फलटण येथील 4, साखरवाडी 3, आदर्की बुद्रुक आणि तरडफ येथे प्रत्येकी 1 , फलटण शहरात 3, असे रुग्ण सापडले असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
आज फलटण शहर 26 ,खटकेवस्ती 5, तामखडा 5, मुंजवडी 4, मिरडे आणि साखरवाडी येथे प्रत्येकी 3, गोखळी , नाईकबोमवाडी, विडणी, आदर्की बुद्रुक, तरडफ येथे प्रत्येकी 1 अशी एकूण रुग्णांची संख्या 51 आहे