महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या चिंतेची बाब असली तरी अनेक जण अद्याप भ्रमात असून निष्काळजीपणे वावरत आहेत. कोरोनाची महामारी किती भयानक आहे अद्यापि त्याच्यावर औषध उपलब्ध नाही. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास हा कोरोना आपल्या गावातून घरातून हद्दपार करू शकतो याबाबतची जनजागृती करण्यासाठी मसूर लायन्स क्लबने कंबर कसली असून आपली सामाजिक बांधिलकी समजून अक्षरशा रस्त्यावर व गल्लीबोळात फिरून नागरिकांना सावधानतेचा इशारा देत तूच आहेस तुझ्या आरोग्याचा शिल्पकार असा मूलमंत्र देत आहेत.
शहराबरोबरच मसूर व मसूर परिसरात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी मसूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
या मोहिमेत सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी असे आव्हान करत लायन्स प्रांतपाल जगदीश पुरोहित व मसूर लायन्स क्लब अध्यक्षा सौ. जान्हवी पुरोहित चिरंजीव सागर पुरोहित यांनी आता रस्त्यावर उतरून गावाात सर्वत्र फिरून स्वतःच्या गाडीतून लाऊड स्पीकरद्वारे जनजागृती मोहीम सुरू केली आहे. आपली टेस्ट करुन घ्यावी कोरोणा झाल्यास घाबरु नये त्याला धिराने तोंड देणे, गर्दीतून फिरू नका, एकत्रित पार्ट्या करू नका, मास्क व सॅनिटायझर वापर करा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका , स्वतःबरोबरच आपल्याा कुटुंबाची काळजी घ्या. असे सांगत मार्मिक सुरेल गाण्यातून ते सर्वांचे लक्ष वेधत जनजागृती करत आहेत . व सर्वांना लायन्स क्ल्बच्या वतीने आवाहन करत आहेत.सर्वांनी आपली वेळीच तपासणी करुन घ्या लक्षण अंगावर काढू नका स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाचेही रक्षण करा लायन्स क्लब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असा धीर देत आहेत.
या जनजागृती प्रसंगी मसूर येथील मुख्य चौकात मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, लायन्सचे सदस्य डॉ रमेश लोखंडे, जितेंद्र निकम, सदाशिव रामुगडे,लक्ष्मण राजमाने,रमेश जाधव बाळकृष्ण गुरव,गजानन चेणगे,बसवेश्वर चेणगे ,जगन्नाथ कुंभार राम धरणे शांताराम शेटे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.