पवार साहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड दक्षिणच्या वतीने जाहीर निषेध
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : काल काही संकुचित समाज कंठक आंदोलकानांनी महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय पवार साहेब यांच्या घरावर आंदोलनाच्या नावावर हल्ला केला. या समाजकंठकांचा निषेध करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड दक्षिणच्यावतीने प्रांत, तहसीलदार, उपविभागिय पोलीस अधिकारी डी वाय एस पी यांना निवेदन देण्यात आले.
गेली साठ दशके सर्वसामान्य जनतेसाठी समाजकारण राजकारण करणारे लोकनेते आदरणीय शरद पवार साहेब हे एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच आग्रही राहिले आहेत. एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक अधिवेशनात उपस्थतीत राहून राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना साहेब करत असतात. सध्या चालू झालेल्या आंदोलना बाबत देखील आदरणीय साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतली होती। असे असताना जाणीव पूर्वक काही समाज कंठकांनी भडकवल्यामुळे एसटी कर्मचारी साहेबांच्या घरावर चालून गेले. हाय कोर्टाने निकाल दिलेला असताना साहेबांच्या घरावर चालून जाण्याच्या ह्या घटनेमागे संकुचित राजकारण दिसून येत आहे यामुळे या आंदोलकांवर तसेच त्यांना भडकवणार्यांना लोकांना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी कराड दक्षिणच्यावतीने प्रांत, तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सातारा चे सदस्य मा. संतोष पाटील बाबा, कराड शहराचे पदाधिकारी मा. पोपटराव साळुंखे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मा. सचिन कुराडे, कराड दक्षिण युवक अध्यक्ष मा.अमित पाटील, कराड दक्षिण उपाध्यक्ष मा. सागर देसाई, विद्यार्थीचे जिल्हा सरचिटणीस मा.अक्षय शिंदे, मा.शुभम जगताप, युवक उपाध्यक्ष मा. विक्रमसिंह पाटील, मा.मोहमद आऊटी, संजय पानवळ, अक्षय गायकवाड, ओंकार देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.