महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(सोमेश्वरनगर)
श्रावण महिन्याची सांगता सांगता झाली असल्याकारणाने मटन दुकानाच्या पुढे सोशल डिस्टन्स पालक करत का होईना गर्दी पहावयास मिळत आहे मटन खवय्यांसाठी मोजून चार पाच दिवसच असल्याकारणाने परिसरातील सर्वच दुकानांमध्ये सकाळपासूनच मटण, चिकन व मासे घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती…मटणाला सहाशे रुपये किलोमागे भाव असला तरी मटण घेणे पसंत केले.
हवेत गारवा वाढला असून थंडी वाढल्याने मांसाहारी पदार्थांची मागणी वाढली आहे .यामध्ये मासे ,मटण ,चिकन ,गावरान चिकन व अंडी यांच्या दरात चांगलीच वाढ झाली .पालेभाज्या, कांदे नंतर मटाच्या किमतीत वाढल्या आहेत . आषाढी एकादशी यानंतर दर महिना वीस वीस रुपयांनी भाव वाढला असून श्रावण महिन्या अगोदचा भाव सरारी वीस रुपयांने कमी होता परंतु आत्ता तो मटन किलो चा भाव ६०० रुपये झाला आहे. तर आता किलोमागे २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे .६०० किलो पर्यंत मटनाचे दर पोहोचले आहेत .
कोरोनाच्या काळात बरेच दिवस सर्वत्रच दुकाने बंद होती व त्यानंतर लगेचच श्रावण महिना चालू असल्याने सोमेश्वरनगर परिसरात मटण दुकाने बंद असतात परंतु आजअखेर श्रावण महिना संपल्या कारणाने ही दुकाने उघडली असून मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे मटणाचे दर वाढले हे मूळ कारण असल्याचे विक्रेते सांगत आहेत .
त्याचबरोबर कोरणा च्या पार्श्वभूमीवर छोटे-मोठे व्यवसायिक कारखानदारी करणारे बकरे, बोकडांच्या चामड्याच्या फॅक्टरी बंद झाल्याने चामड्याची विक्री कमी झाली आहे. चामड्याचा रेट धुळीला (मातीमोल ) आल्यामुळे मटण विक्रेत्यांनी मटणाचे भाव वाढवले आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांचा आणि बोकडांचा बळी गेल्याने बाजारात त्यांची आवक कमी झाली आहे. कमी पुरवठ्यामुळेही भाववाढ झाली आहे.याशिवाय आषाढानंतर कार्तिक महिन्यापर्यंत अनेक सण उत्सव असल्याने त्यापूर्वीच मटणाला मागणी वाढते आणि त्यापाठोपाठ मटणाचे दरही वाढतात.
सध्या पाऊसकाल चंगला झाला असल्याने व वीर धरणातून निरा नदीमध्ये विसर्ग सोडल्याने मासे तळाशी जातात, त्यामुळे मासेमारीत घट होते. त्यामुळे ऊर्जेसाठी खवय्ये मांसाहाराकडे वळतात, त्यामुळे मटणाला मागणी वाढते आणि मटणाचे दर वाढतात.गावरान कोंबडी नुसत कापून तुकडे करून घेण्यासाठी ही ५०ते,६० रुपये मोजावे लागत आहेत .अत्याधुनिक युग असल्यांने संपर्क व .सोशल मीडियावरती मटणाच्या दराबाबत चर्चा होत .मटण खाणाऱ्यांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागणार आहे. लॉगडाऊन काळात बरेच दिवस बंद होती त्यानंतर लगेचच श्रावण महिना सुरू झाला त्यामुळे मटण व्यावसाईक दुकाने बंद असल्याने आर्थिक परिस्थिती ला सामोरे जावे लागले परंतु दोन दिवस दुकाने सुरू झाली असून आणि समाधानकारक विक्री होते.






















