महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिलकीस शेख (लोणंद)
लोणंद येथील विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूलमध्ये झूम मीट वरून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. शाळा बंद पण शिक्षण आहे त्याचप्रमाणे शाळा बंद पण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन विश्वक्योत इंटरनॅशनल स्कूल तर्फे करण्यात आले.
तसेच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवून या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करून पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजवण्यात आले पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ममता अरोरा यांचे सहकार्य लाभले या ऑनलाइन प्रशिक्षणास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला व सुंदर व सुबक गणेश मूर्ती बनवल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाइन प्रक्रियेतून विद्यार्थी शिकत आहेत.
या अनोख्या ऑनलाइन पर्यावरणपूरक प्रशिक्षणाचे पालकांनीही कौतुक केले या पुर्ण कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. स्वाती शहा व विश्वज्योत स्कूलच्या शिक्षिका अंजली ननावरे, नम्रता सुड़के व स्वराली शहा यांचे सहकार्य लाभले. शाळा जरी बंद असल्या तरी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून किंवा प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही व आजच्या आधुनिक युगात कोडींग सारखे शिक्षण जरी विद्यार्थ्यांना मिळत असले तरीही भारतीय संस्कृती जपणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. असे वक्तव्य विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीनीला काला यांनी केले.