महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार सदस्य बांधवांनी , पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे सदस्य असलेल्या पत्रकारांसाठी , कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता समाजहिताबरोबर कोविड योद्धा म्हणून आदर्श भूमिका बजाविली अशा पत्रकारांना “राज्यस्तरीय कोविड योद्धा पत्रकार पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार आहे.प्रत्येक जिल्ह्यातून ५ पत्रकारांची निवड केली जाणार आहे.
पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आप-आपले प्रस्ताव slonkar351@gmail.com या इमेलवर सोमवार दि. २४ ऑगष्ट २०२० पर्यंत पाठवण्याचे आवाहन पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे . प्रस्तावामध्ये कोरोनाच्या काळात स्वतः केलेले सामाजिक काम , त्याचे फोटो , बातमी कात्रण इत्यादी कामाची माहिती पाठवावी.इतरांच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे उपस्थित राहणे अथवा दुसऱ्याच्या कार्यक्रमात अन्नधान्य अथवा आवश्यक वस्तूंचे वाटप असे फोटो अगर बातम्या पाठवू नयेत , असे आवाहन पुणे जिल्हा पत्रकार संघाने केले असल्याची माहिती अध्यक्ष सुनिल लोणकर यांनी दिली आहे






















