मेढा नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी ३ कोटी ३७ लाख आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; हायमास्ट दिवे, जिमखाना, संरक्षण भिंतीसाठी ३५ लाख मंजूर
सातारा- मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर या नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मेढा नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी ३ कोटी ३७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पाच हायमास्ट दिवे बसवणे, लक्ष्मीमाता मंदिर येथे संरक्षण भिंत, जिमखाना बांधण्यासाठी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना.अजित पवार आणि ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. मेढा नगरपंचायत प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी निधी मिळावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लेखी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार आणि नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य या योजनेतून नगरविकास विभागाने प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी ३ कोटी ३७ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मेढा मुख्य रस्ता व मुख्य चौक येथे पाच हायमास्ट दिवे बसविण्यासाठी १० लाख, लक्ष्मीमाता मंदिर देशमुखवाडी येथे संरक्षण भिंत व मोकळ्या जागेत जिमखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आहे. निधी उपलब्ध झाल्याने प्रशासकीय इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून मेढा नगरीच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. या सर्व कामांना भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजितदादा आणि ना. शिंदे यांचे आभार मानले आहेत.