पुसेगाव दि .[ प्रकाश राजेघाटगे ] राजकीय परिस्थिती विपरीत असताना मिळवलेला विजय हा खऱ्या अर्थाने खूप मोठा विजय असतो कारण यात त्या भागातील सामाजिक स्थैर्य बिघडलेले असते.या वर सहसा सामान्य व्यक्ती काही बोलत नसतो परंतु त्याचे मन आक्रमक झालेले असते.त्या अन्यायाविरुध्द जर कोणी ठामपणे उठून उभा राहिला तर सामान्य जनता ही त्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहते याचा प्रत्यय मागील ग्रामपंचायत(2018) निवडणूकीत श्री.अभयसिंह राजेघाटगे यांना आला होता.मागील ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी श्री.अभयसिंह राजेघाटगे अपक्ष निवडणूक लढून निवडून आले होते.त्यानंतर गेल्या पाच वर्षातील कालखंडात त्यांनी केलेल्या लोकोपयोगी विकास कामाने जनता इतकी भारावून गेली की,काही दिवसापूर्वी झालेल्या बुधच्या सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणूकीत श्री.अभयसिंह राजेघाटगे यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास पॕनेलला संपूर्ण बहुमत प्राप्त झाले. विशेषतः सरपंचपदाच्या उमेदवार सौ.सुजाता बोराटे यांना तब्बल ९८५ मतांची आघाडी मिळून विरोधात असलेल्या तीन उमेदवार असलेल्यांचा पराभव झाला.
गेल्या वेळी अपक्ष म्हणून थेट सरपंचपदासाठी श्री.अभयसिंह राजेघाटगे निवडून आले आणि बुध ग्रामपंचायतीला लागलेल्या विकासकामाच्या ओहोटीचे रूपांतर भरतीमध्ये चालू झाले.गावातील बहुतांश रस्त्याचे सिमेंट क्रांक्रटीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले.विशेषतः सर्व गल्लीबोळातील सिमेंट कॉंक्रिटिकरण रस्ते पूर्ण करून बंदिस्त गटारयोजना राबवून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली,त्यामुळे गांवातील बरेचसे रस्ते रूंदीकरण झाले.गांव जोडणारे ओढ्यावरील चार पूल बांधून रस्ते दळणवळणासाठी खुले केले.गेल्या पाच वर्षांत कधी नव्हे इतका समाजकल्याणचा निधी खेचून आणला आणि दुर्लक्षित दलित वस्तीतील गैरसोयी दूर झाल्या. कोरोना सारख्या जागतिक संकटावेळी घरोघरी जावून आरोग्य प्रबोधन केले,तसेच कोरोना सेंटर,आरोग्य तपासणी व कोरोनाबाधित लोकांची विशेष काळजी घेतली.शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधून संपूर्ण डिजीटलाजेशन केले. त्याचबरोबर स्टँन्डवर सीसी टीव्ही कॅमेरे ,स्वच्छतागृहे याचीही सोय करण्यात आली.अक्षय ऊर्जास्ञौत म्हणून ज्यांची गणना केली जाते असा सौर ऊर्जा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबवून त्याखाली सर्व सरकारी कार्यालये आणली.सत्तेचा उपयोग सर्व समाजातील लोकांसाठी केला.या सर्व कार्याचा परिपाक म्हणून चंदीगढ येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून त्यांची एकमेव सरपंच म्हणून निवड झाली.
श्री.अभसिंह राजेघाटगे हे पदवीधर शेतकरी आहेत.शेती करत असताना वडील कै.उदयसिंह राजेघाटगे यांचा समाजकारणाचा वसा ते आज पुढे नेताना दिसत आहेत.शाळेय जीवनापासूनच खेळांची आवड असलेले श्री.अभसिंह राजेघाटगे राजकीय क्षेत्रातही उत्कृष्ट खेळाडू म्हणून बुध परिसरात परिचित आहेत.बुध तसेच विभागातील बहुतांश गावातील लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.श्री.महेश शिंदे यांच्या विधानसभा निवडणूकीत त्यांना श्री.अभयसिंह राजेघाटगे यांची मोलाची साथ लाभली हे सर्वज्ञात आहे.याच जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत ते आपले नशीब आजमवतील अशी चर्चा बुध जिल्हा परिषद गटात आहे.
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर होणार आहेत.त्यामुळे प्रत्येक तालुक्यात गांवस्तरीय नेते निवडणूकीसाठी आतापासून शड्ठू ठोकून आहेत.कारण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती ह्या शास्वत विकासाची दालने आहेत.या माध्यमातून विकासाचकामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविता येतात.त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीला श्री.अभयसिंह राजेघाटगे यांनी मैदानात उतरावे अशी जनतेची अपेक्षा आहे.बुध सारख्या मोठ्या ग्रामंपचायत निवडणूकीत त्यांनी मिळवलेला एकतर्फी विजय ही त्यांच्या जमेची बाजू आहे तर आमदार श्री.महेश शिंदे यांचा भक्कम पाठिंबा श्री.अभयसिंह राजेघाटगे यांच्या पाठीशी असेल यात शंका नसावी.त्यामुळे श्री.अभयसिंह राजेघाटगे यांचा विजय आतातरी सुकर दिसत असला तरी सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची वाटचाल अश्वगतीने चालू आहे.निवडणूक असो अथवा नसो ,पद असले काय किंवा नसले तरी सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना फायदा मिळावा यासाठी श्री.अभयसिंह राजेघाटगे नेहमीच कार्यमग्न असतात म्हणून तर बुध परिसरात अडी-अडचणीला उभा राहणारा आपला हक्काचा माणूस अशी त्यांची ओळख आहे आणि याच जोरावर ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत नक्कीच यश संपादित करतील अशी खात्री आहे.