पोस्टल डिपार्टमेंट कडून विशेष फोटो स्टॅम्प
महाराष्ट्र न्यूज सातारा प्रतिनिधी :
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला क्षेत्रात खंभीरपणे उभ्या आहेत. असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा समावेश नाही. अशाच महिला एल. आय. सी. एजंट मनिषा मुळीक यांनी राजधानी साताराचे नाव सातासमुद्रापलीकडे नेण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि अफाट असे यश मिळवले.पश्चिम क्षेत्रातील सातारा डीव्हीजन मधील ग्रामीण नागझरी गावातील महिला अभिकर्ता सौ.मनीषा आप्पासो मुळीक याना झोन मध्ये म्हणजेच महाराष्ट्र,गुजरात, गोवा,राज्यात प्रथम नंबर मिळवला व संपूर्ण भारतात तिसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल जाहीर सत्कार झाला व पोस्टल डिपार्टमेंट कडून त्यांच्या फोटोचा स्टॅम्प परवानगीसहित प्रथम सहस्त्रवीर म्हणून गौरवण्यात आले सहस्त्रवीर म्हणून मनीषा मुळीक यांचा एलआयसी चेअरमन एम.आर.कुमार यांचेकडून विशेष गॊरव केला आहे .
यावेळी एल आय सी झोनल मॅनेजर विकास राव ,आप्पासो मुळीक उपस्थित होते, स्टॅम्प इंडिया टपालच्या डाक तिकिटांच्या वैयक्तिकृत पत्रकासाठी स्वतःच्या ब्रँड नेम असा या माय स्टॅम्प चा अर्थ आहे .
एल . आय. सी मध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल नेहमीचं त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. जवळजवळ १०० सन्मानचिन्हे त्यांनी आजपर्यत मिळवली आहेत. प्रत्येक प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरायचे आणि ती स्पर्धा जिंकायचीच हा निर्धार त्या करतअसतात .
भविष्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानी पासून स्वतःला वाचवण्यासाठी एखाद्याला एक रकमी रक्कम देण्यासारखे आहे अश्या प्रकारे जेव्हा काही दुदैवीपणाचे प्रकरण येते तेव्हा विमा उतरवणारा मदत करतो तो विमा देण्याचे काम मनीषा मुळीक करत आहेत .
एक उद्योजक म्हणून त्या काम करत असतानाच तितक्याच सामाजिक कार्यात पण त्या अग्रेसर आहेत गावपातळीवर महिलांसाठी आजपर्यत विविध उपक्रम त्या राबवत आहेत . ग्रामीण भागामध्ये लोकांना त्यांच्या भविष्या विषयीची पॉलिसी काढणं किती गरजेचे आहे हे ते समजावून सांगतात.