महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:मयुर देवकर(इंदापूर-सुगांव)
इंदापूर येथे मा.श्री.हर्षवर्धनजी पाटीलसाहेब माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य,यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह कोविड सेंटर येथील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी ते आजारातून लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांना डाळिंब,केळी आशा फळांचे वाटप करण्यात आले.
तसेच तेथे उपस्थित असणारे डॉक्टर्स,नर्स,आरोग्य कर्मचारी व पोलीस बांधव यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी इंदापूर पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई अविनाश रेडके, पंचायत समिती सदस्या स्वातीताई शेंडे, रोहिणीताई घोगरे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य मा.श्री.महेंद्रदादा रेडके, बापूराव शेंडे, गोरख शिंदे,दादासाहेब घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.






















