महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे विद्यानगर (सैदापुर) आज अनेक नामवंत शिक्षण संस्था अनेक शासकीय खाजगी महाविद्यालयाने जणू बहरलय.पुणे-मुंबईच्या समकक्ष येथील शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्प व माफक फी मध्ये वरदान ठरतय.स्पर्धेच्या युगात अनेक मुलं-मुली दिशा भटकुन अक्षरशा: भरडली जातायत.
पण अजूनही मूळ पायाभूत शिक्षणाचा पाया जपलेल्या काही शिक्षणसंस्था आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आयडियल नॉलेज अकॅडमी “One step Towards Success” या त्यांच्या स्लोगन प्रमाणे ‘यशाच पहिले पाऊल म्हणजे आयडियल नॉलेज’..मुलांनी मोठे व्हावे,अकरावी बारावीच्या महत्त्वाच्या वर्षात पालक मेहनतीने कष्टाने लाखो रुपये खर्च करून व शंभर-दीडशे मुलांच्या गर्दी असलेल्या बॅचमध्ये क्लासेसमध्ये आपल्या मुलांना बसवतात. एवढ्या गर्दीत आपल्या पाल्याला व्यक्तिगत मार्गदर्शन खरच भेटत का? हा संशोधनाचा विषय आहे.पण अगदी मर्यादित विद्यार्थ्यांना घेऊनच गुणवत्ता शिक्षण प्रदान करने, त्यामुळे विद्यार्थ्यांची समग्र विकासासह बौद्धिक क्षमता वाढते.
मुळातच निकालाची उज्ज्वल परंपरा ही 2017 पासून असल्याने बारावी बोर्ड परीक्षा निकालांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केलय.अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद त्याचबरोबर दर महिन्याला बाहेरील नामवंत व्यक्तींची गेस्ट लेक्चर असे उपक्रम विद्यार्थ्यांना बाहेरील जगाविषयी अनेक निरनिराळ्या क्षेत्रातील अधिकची माहिती देतात.अकरावी-बारावी सायन्स बरोबर JEE, NEET, MH-CET,NATA,NDA याही परीक्षांची परिपूर्ण तयार करून घेतली जाते. आणि शिक्षकांनी स्वतः तयार केलेल्या सुधारित नोट्स, त्याचबरोबर सराव असे मापदंड असल्यास विद्यार्थी परीपूर्ण होऊनच या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगात टिकू शकेल एवढी तयारी करून घेतली जाते.
या आयडियल नॉलेज अकॅडमीचे संचालक शरद भोसले,राम चव्हाण हे उच्चविद्याविभूषित असून स्वतः त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवून आपल्या ज्ञानार्जनाचे अखंड कार्य चालू ठेवले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या आयडियल नॉलेज अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या यशाचे शिखर नक्कीच काढता येईल यात शंका नाही.