प्रवीण सावंत याची भारतीय आर्चरी संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड सातारा ; इराक येथे होणाऱ्या ज्युनियर आशिया कप,स्टेज -११ वर्ल्ड रॅकींग टुर्नामेंट आर्चरी स्पर्धेसाठी , पोलीस क्रीडा प्रबोधिनी सातारा चे धनुर्विद्या खेळाचे मार्गदर्शक प्रवीण सावंत यांची निवड झाली आहे प्रवीण सावंत हे सातारा पोलीस दलामध्ये 2012 साले धनुर्विद्या खेळाडू म्हणून भरती झालेले आहेत व आत्ता सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून पोलिसांच्या मुलांना व खाजगी मुलांना धनुर्विद्या प्रशिक्षण इ देण्याचे कार्य पोलीस कवायत मैदान सातारा येथे देत आहेत सध्या ते सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे कर्तव्य वर आहेत. इराक येथे होणाऱ्या जूनियर एशिया कप स्पर्धेमध्ये प्रवीण सावंत यांनी घडविलेले दोन खेळाडू आदिती गोपीचंद स्वामी व प्रथमेश भालचंद्र फुगे हे सहभागी होणार आहेत त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारतीय संघावर प्रशिक्षक म्हणून निवड केलेली आहे. या यशाबद्दल सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल त्या सोबत पोलिस उपअधीक्षक अजित बोऱ्हाडे सर व सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे इन्चार्ज विठ्ठल शेलार साहेब राखीव पोलीस निरीक्षक आलदर साहेब व स्पोर्ट्स इन्चार्ज व पोलिस क्रीडा प्रबोधिनी चे संघटक शशिकांत गोळे व जिम इन्चार्ज व पोलीस क्रीडा प्रबोधिनीचे संघटक शिवाजी जाधव यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या