वाई : वाई तालुक्यातील अनपटवाडी येथे पारधी समाजातील महिलेने रान डुक्कराचे मांस विक्री केल्याप्रकरणी वाई वनविभागाने कारवाई करून तिला अटक केली आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, खास खबऱ्याकडून वाई वनविभागास माहिती मिळाली होती की, अनपटवाडी येथील पारधी समाजातील वस्तीमध्ये रान डुक्कराचे मांस विक्री केले जात आहे. त्यावरून दि.११ रोजी वाई वनविभागाने वस्तीवर छापा टाकला असता काहीजण तेथून पळून गेले. त्यांच्यातील ऐका महिलेला पकडण्यात वनविभागाला यश आले. त्या महिलेचे नाव छम्मा सिंह असून या महिलेने डुक्कर या वन्यप्राण्यांचे मांस विक्री केलेचा गुन्हा कबूल केला आहे. त्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
ही कार्यवाहई महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वाई स्नेहल मगर, वनपाल वाई सुरेश पटकारे, वनरक्षक वाई वैभव शिंदे यांनी केली. या कारवाईसाठी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सरोदे व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.