महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथ मोते यांचं काल अचानक निधन झाले ते 68 वर्षांचे होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ते आधारस्तंभ होते.
मोते यांनी शिक्षक परिषदेचे उल्हासनगर जिल्हा कार्यवाह, कोकण विभाग कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली होती. अत्यंत अभ्यासू आणि परख़ड आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता.
त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळेच २०१५ मध्ये १ हजार ४०० शिक्षकांची भरती करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिला होता. सलग दोन वेळा विधान परिषदेत शक्षकांचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे.




















