महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
भारतात वाहनांच्या विम्या संदर्भात एक नवा आदेश जाहीर करण्यात आला आहे. प्रदुषण नियंत्रण सर्टिफिकेट म्हणजेच पीयुसी नसल्यास इंन्शुरन्स काढता येणार नाही भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) यांनी हे आदेश जाहीर केले आहेत. वाहनांची नोंदणी करतानाही आता प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट लागणार आहे., जर एखाद्या वाहनाची पीयुसी नसल्यास इन्शुरन्स दिला जाणार नाही आहे. या नियमानुसार खासकरुन दिल्ली-एनसीआर येथे लक्ष दिले जाणार आहे.
नव्या आदेशानुसार वाहनाचे इन्शुरन्स काढताना वाहनधारकाकडे पीयुसी सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. त्यामुळे अन्य महत्वाच्या कागदपत्रांसह पीयुसी सुद्धा द्यावी लागणार आहे. पीयुसी हे असे सर्टिफिकेट आहे जे वाहनातून निघाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या नियंत्रण मानकांच्या बद्दल सांगते. देशात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रदुषण मानक स्तर ठरवण्यात आला आहे.
एखाद्या वाहनाची यशस्वीपणे पीयुसीची तपासणी झाल्यास वाहनधारकाला एक प्रमाण पत्र म्हणजेच सर्टिफिकेट दिले जाते. त्यामुळे वाहनातील प्रदुषणाचा स्तर किती आहे ते समजून येते. सरकारच्या नियमांनुसार सर्व वाहनांसाठी वैध पीयुसी असणे अत्यावश्यक आहे. परंतु पीयुसी नसल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो.
नागरिकांना लक्षात असू द्या की, IRDA ने जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रमुखांना यांना एक पत्र पाठवले आहे. यापूर्वी सुद्धा 2018 मध्ये याच पद्धतीचा संदेश पाठवण्यात आला होता. दरम्यान, नव्या आदेशा नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये अधिक लक्ष दिले जाणार आहे. मोटर वाहन (संशोधन) अधिनियम 2019 अंतर्गत पी यु सी चे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. तर हा नियम अद्याप काही राज्यात लागू आहे.