कराड : ग्राहक चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, कराड जिमखान्याचे सदस्य तसेच सामाजिक, शैक्षणिक व वृत्तपत्र क्षेत्रातील जाणकार, लेखक विवेक विश्वनाथ ढापरे (वय-52) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे.
अतिशय हरहुन्नरी, विविध विषयांची जाण असलेला, सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होणारा एक सह्रदयी व्यक्तिमत्व म्हणून विवेक ढापरे ओळखले जात होते. ग्राहक पंचायत, शिक्षण मंडळ कराड, कराड नगरपरिषद, कराड जिमखाना, विजय दिवस समारोह समिती अशा संस्थांमधील विविध ऊपक्रमात ते सहभागी असायचे. विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख ही त्यांचे विविध वृत्तपत्रात प्रशिध्द झाले आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कराड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
































