महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी : (बिलकीस शेख)
खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रदेश प्रतिनिधी अॅड.बाळासाहेब बागवान यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी काँग्रेसकडून केंद्रसरकारसह उत्तर प्रदेश सरकारच्या अन्यायकारक जुलमी राजवटीचा धिक्कार करण्यात आला.केंद्रसरकारकडून पारित करण्यात आलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याचा निषेध तसेच राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्की साठी जुलमी मोदी-योगी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी शहरातून रॅली काढत केंद्र सरकारच्या विरोधात आणि योगी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द झालाच पाहिजे,कामगार विरोधी काळा कायदा रद्द झालाच पाहिजे, भाजप पक्षाचा धिक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो अशी घोषणा बाजी करण्यात आली.तसेच उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या घटनेतील मुलीला न्याय मिळाला पाहिजे.अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच नगरपंचायत पटांगणा समोर एकत्रित येत उपस्थित असलेल्या लोकांना अॅड.बाळासाहेब बागवान यांनी केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या बाबतचे बिल हे अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले.अॅड.बाळासाहेब बागवान यांच्यासह राजेंद्र डोईफोडे, नगरसेविका शैलजा खरात, नगरसेविका स्वाती भंडलकर, नगरसेविका हेमलता कर्णवर, मस्कु अण्णा शेळके, शरद भंडलकर, दादासाहेब शेळके, रमेश कर्णवर, उमेश खरात, अशोक डोईफोडे,अण्णा जाधव, प्रणव डोईफोडे, विशाल शेळके, विशाल भंडलकर, अजिंक्य खरात, जाहीर बागवान, तारीक बागवान, नितीन धायगुडे, सचिन शेळके आदीसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ,अडते, हमाल, शेतकरी बांधव ही उपस्थित होते.






















