आयुक्त तुकाराम मुंढे यांची सचिवालयात बदली
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सचिवालयात बदली करण्यात आली आहे.त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूर महानगर पालिकेचा कार्यभार सांभाळतील. अपर सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढून ही माहिती दिली आहे.तुकाराम मुंढे यांच्यासाठी पद उन्नत करून त्यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नुकताच तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली होती.
नागपूरमधी ल कारकीर्द वादग्रस्त
नागपूर महानगर पालिका आयुक्त असताना त्यांच्या कारकीर्दीची बरीच चर्चा झाली. त्यांचा महापौराबरोबरही वाद झाला होता.नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापौर, सत्ताधारी आणि विरोधक, असा सामना रंगला होता. या वादात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतल्यामुळे या वादाची बरीच चर्चा झाली होती.
































