कराड शहर पोलीसांची कारवाई : दोघेजण ताब्यात
कराड : कराड शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातील एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
प्रसाद अनिल देशमाने (वय 24 वर्षे), व्यवसाय शिक्षण, रा. सावळेश्वर मंदरीराजवळ, बुधवार पेठ, पुसेसावळी, ता. खटाव जि. सातारा 2) आकाश दत्तप्रसाद बाचल (वय 22 वर्षे), व्यवसाय शिक्षण, रा. गणपती मंदरीराजवळ, बुधवार पेठ, पुसेसावळी, ता. खटाव, जि. सातारा असे तब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२१रोजी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान कराड शहरात सक्त नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरू होती. पोपटभाई पेट्रोलपंप याठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा पाटील, बीट मार्शल 01 चे संग्राम पाटील व दीपक पाडळकर असे नाकांबंदी करत असताना एक सिल्वर रंगाची एस्टीम कार क्र. एमएच 14 एएम 9092 ही आली. डी. बी.चे संग्राम पाटील यांना कारवर संशय आल्याने हि कार थांबवून तपासली असता. त्यामध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ पानमसाला गुटखा असल्याचे निदर्शनास आले. मोटार कारमधील दोघांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी नमुदचा गुटखा प्रथम कोल्हापूर येथून घेवून आल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात आणून सपोनि अमित बाबर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने विचारपुस केली असता हा माल कर्नाटकातून घेवून आल्याचे निष्पन्न झाले. या कारवाई दरम्यान एकुण 3लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 1लाख 59हजार रुपयांचा विमल पानमसाला गुटखा व 2लाख रुपयांची एस्टीम कार अशी जप्त करण्यात आली. या कारवाई दरम्यान दोन संशयीत अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमित बाबर हे करत आहेत.
एस्टीम गाडीत मिळून आलेला पानमसाला गुटखा हा प्रतिबंधीत अन्नपदार्थ असलेने तो बेकायदेशीर विक्री करत असताना मिळून आल्याने त्यास एस्टीम गाडीसह पुढील कारवाई कामी अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा यांना माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा यांनी दिलेल्या तक्रारी नुसार कराड शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर सहा.पोलीस निरीक्षक, पोउपनि अशोक भापकर, सफौ राजू पाटील,पोकॉ संग्राम पाटील, पूजा पाटील, दीपक पाडळकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे पोलीस नाईक संजय जाधव, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी कारवाई केलेली आहे.




















