महाराष्ट्र न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले :
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन जानेवारी २०२१ मध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथे होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष काका चव्हाण यांनी दिली . पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला .
पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे . पुणे जिल्ह्यात ५५० ग्रंथालये कार्यरत आहेत . सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने वार्षिक अधिवेशन पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे वतीने घेण्याची मागणी राज्य ग्रंथालय संघाने मान्य केली आहे .
शासकीय नियम पाळून मर्यादित प्रतिनिधींच्या उपस्थितीत अधिवेशन घेऊ असे कार्यवाह सोपानराव पवार यांनी बैठकीत सांगितले . जिल्हा संघाच्या बैठकीत रामा संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल कार्यकारिणीचे सदस्य विजय कोलते यांचा जिल्हा अध्यक्ष काका चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आर्थिक संकटात असताना राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानाची संपूर्ण रक्कम देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला , त्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला .