महाराष्ट्र न्यूज वाई तालुका प्रतिनिधी………..
वाई पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस ; वाई शहरात होणारे घरफोडी व चोरीच्या गुन्हयांना आळा घालणे करीता बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन यांनी गुन्हे प्रकटीकरण विभाग वाई पो.स्टे.च्या कर्मचा यांना सुचना देवून मार्गदर्शन केले होते.
दिनांक ०८/०१/२०२२ रोजी त.ल.जोशी विद्यालय,वाईचे उपमुख्यांध्यापक दादा भानुदास बनसोडे रा.रामनगर ता.जि. सातारा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,दिनांक १/१/२०२२ रोजी ११.३० ते दिनांक ०३/०१/२०२२ रोजीचे सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान शाळेतील संगणक विभागाचे खोलीच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरटयाने शाळेतील मॉनिटर,अँप्लीफायर,माईक स्टण्डसह,केबल व फॅन असे एकुण २६००० / रुपयांचे साहीत्य चोरीस गेलेले आहे. त्यानूसार वाई पो.स्टेशनला गु.र.नं.०८/२०२२ भादविस कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हे प्रकटीकरण विभाग वाई पो.स्टेशनचे पथक वाई शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये पेट्रोलिंग करुन व बातमीदारामार्फत अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक वाई पो.स्टेशन यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,गुरेबाजार झोपडपट्टी,सिध्दनाथवाडी,वाई येथे राहणारी ३ मुले व १ विधी संघर्ष बालकाने वाई शहरात बरेच चोऱ्या केलेल्या आहेत.त्यानंतर बाळासाहेब भरणे यांना सदरची माहीती गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांना देवून आरोपींना तात्काळ पकडणे बाबत सुचना दिल्या.त्यानूसार तीन आरोपी व एक विधी संघर्ष बालक यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांनी वाई शहरात फिरत असताना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी त.ल.जोशी विद्यालय वाई,येथिल चोरी केली असल्याचे कबूल करुन त्याशिवाय गंगापूरी व मच्छि मार्केट वाई येथिल नविन बांधकामाच्या ठिकाणच्या २० सेंन्ट्रींग प्लेटा,पुलाच्या नविन बांधकामाच्या ठिकाणची केबल चोरली असल्याचे कबूल केले असून त्यांनी चोरलेला सुमारे ८०,०००/ रुपय किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.सदर आरोपींच्या विरुध्द वाई पोलीस स्टेशनला १) गु.र.नं.०८/२०२० भादविस कलम ४५४,४५७,३८० २). गु.र.नं.०९/२०२० भादविस कलम ३७९, ३) गु.र.नं.१०/२०२० भादविस कलम ४५४,४५७,३८०, ३४ प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई अजयकुमार बन्सल,पोलीस अधीक्षक सातारा,अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जान्हवे खराडे उप विभागीय पोलीस अधिकारी,वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन.गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ.अमित गोळे,किरण निंबाळकर,प्रसाद दुदुस्कर.श्रावण राठोड केलेली आहे.



























