बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली .
कोरोना व्हायरस आणि अतिमुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे बिहार विधानसभा निवडणुका आता न घेता पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, ‘अद्याप निवडणूक आयोगाने तारिख जाहीर केली नसून निवडणुकां संदर्भातील अधिसूचनाही जारी केलेल्या नाहीत. निवडणूक आयोग परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे.’
अविनाश ठाकूर यांनी बिहार निवडणूका रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की, कोरोना आणि पुरस्थिती यांमुळे बिरामध्ये निवडणूकांसाठी योग्य परिस्थिती नाही.’ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकांची अधिसूचना जारी होण्याआधीच निवडणूका रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत, त्यावर सुनावणी करता येणार नसल्याचं सांगितलं आहे.




















