महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,संलग्नित श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव येथील कृषिकन्या कु. ननवरे प्रियंका परमेश्वर ह्या ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम( 2020-21) अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहेत. यामध्ये निरनिराळे कृषी सल्ले, पीक प्रात्यक्षिके ,चर्चासत्र ,माती – पाणी परीक्षण, जनावरांचे लसीकरण असे उपक्रम राबवत आहेत.
सदर विद्यार्थिनीला श्रीराम संस्थेचे अध्यक्ष मा.प्रकाश (बापू )पाटील, सचिव सौ. श्रीलेखा पाटील ,सहसचिव करण भैया पाटील ,विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसो वनवे ,खजिनदार दिनेश शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या .वेगवेगळ्या उपक्रमातीलच आज एका उपक्रमाचे प्रात्यक्षिक सादर केले.या विद्यार्थीनीने शून्य ऊर्जा शीतगृह या विषयावर प्रात्यक्षिक सादर करून गावातील शेतकऱ्यांना माहिती दिली. शीतगृहाची बांधणी त्यामध्ये मालाची साठवण आणि घ्यावयाची काळजी यावर प्रात्यक्षिक सादर केले.
सदर प्रात्यक्षिक हे सामाजिक अंतर राखून शासन नियमांचे पालन करून सादर करण्यात आले सदर विद्यार्थिनीला श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी हाके ,कार्यक्रमाधिकारी व कार्यक्रम समन्वयक धीरज दोरकर, विषय तज्ञ शिक्षक प्रशांत तरंगे यांनी मार्गदर्शन केले.